मुंबई :- बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा… पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायत कसे, सरकार काय झोपलंय का ? असा संतप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पेपरफुटी प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
दरम्यान अभ्यास करणाऱ्या मुलांचे हे नुकसान असून यामागे कोणतं रॅकेट कार्यरत आहे का ? त्याचा तपास करुन अशा गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी सभागृहात केली.
बारावीचे पेपर सुरु आहेत. आज सकाळी साडे दहा वाजताच बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे गणिताचा पेपर फुटला. गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. पेपरफुटीच्या मागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का ? याची सखोल चौकशी केली पाहिजे. बारावीची परिक्षा देणाऱ्या मुलांचे हे नुकसान आहे. दोषीवर कठोर कारवाई करुन राज्यात सातत्याने सुरु असणारे असे गैरप्रकार थांबले पाहिजेत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी अजित पवार यांनी केली.