संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील येरखेडा – रनाळा मार्गावरील झेन हॉस्पिटल ने सामाजिक भान ठेवून बी.पी.एल कार्ड धारकाकरीता सामाजिक तत्वाअनुषंगाने दहा बेडचा बी.पी.एल व चाँरिटी वॉर्ड सुरू केले.याप्रसंगी कामठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने, युवा चेतना मंच नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष प्रा .पराग सपाटे ,डॉ सुरेश धावडे, कामठीचे माजी नगरसेवक लालसिंग यादव आदी मान्यवरांच्या शुभहस्ते या वार्डाची उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी झेन हॉस्पिटल चे संचालक डॉ आशिष वाजपेयी, डॉ सोपान बगे प्रामुख्याने उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दिव्यांग फाउंडेशनचे सचिव बॉबी महेंद्र डॉआकीब अन्सारी,हिंदू जागरण मंच चे बंटी पिल्ले, चंदन वर्णन, भाजपा कामठी शहर महामंत्री सुनील खानवानी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उद्घाटकीय भाषणातून डॉ संजय माने यांनी प्रत्येक हॉस्पिटलने समाजाप्रती सामाजिक भान ठेवून कार्य करावे व सोबतच सामाजिक निष्ठा बाळगावी अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त केली. हेच कार्य झेन हॉस्पिटलने केले करिता हॉस्पिटलचे संचालक डॉ आशिष वाजपिये व डॉ सोपान बगे यांना या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. सोबतच जास्तीत जास्त लोकांनी या बी.पी.एल व चाँरीटी वार्डचा लाभ घ्यावा असे आवाहन हाँस्पीटलच्या संचालक मंडळाने केले. याप्रसंगी हॉस्पिटलचे सर्व परिचारिका , मदतनीस व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.