दिव्यांगाचा सन्मान, हाच आमचा अभिमान

– वसंतराव नाईक अंध, मूक, बधिर व अपंग विद्यालयाला जिजाऊ शिक्षण महाविद्यालयाचे छात्र अध्यापक व प्राध्यापकांची भेट

यवतमाळ :- येथील जिजाऊ शिक्षण महाविद्यालयातील छात्र अध्यापकांनी IQAC च्या उपक्रमा अंतर्गत वडगाव रोड वरील वसंतराव नाईक अंध मुक, बधिर व अपंग निवासी महाविद्यालयाला भेट दिली.

एक विद्यार्थ्याला घडवण्यामागे त्यांच्या आईवडीलांसह मोठी जबाबदारी शिक्षकावर ही असते. त्यामुळे शिक्षकामध्ये शिकवण्याबरोबर आणखी बरेच गुण असणे आवश्यक आहे याची दखल घेत IQAC च्या उपक्रमा अंतर्गत प्रा.डॉ. प्रकाश नागदेवते यांच्या मार्गदर्शनात जिजाऊ शिक्षण महाविघायातील भावी शिक्षकांनी वसंतराव नाईक अंध, मूक, बधिर व अपंग विद्यालयाला भेट दिली यावेळी मुख्याध्यापिका मीरा राठोड विशेष शिक्षक वैभव घोलप, आरती कलवार, अर्चना थोरात, निलेश लिंगोटे व वसतिगृह अधिशक सिताराम राठोड यांनी दैनंदिन कामकाज, अभ्यासक्रम, पाठ नियोजन याबाबतचे ज्ञान छात्र अध्यापकाना दिले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राजक्ता दरोई व आभार प्रदर्शन सौरभ राठोड यांनी कैले या वेळी प्राचार्य सुनील कावळे, डॉ. प्रकाश नागदेवते, प्रा. योगेश निमजे, प्रा. सुरेंद्र राऊत, प्रा. विजय देऊळकर आदी उपस्थित होते अंशुमन दौलतकर, सौरभ राठोड, प्रज्वल गोरे, विशाल बीसोने यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार

Thu Aug 29 , 2024
– ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत नवी मुंबई :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन २०२३-२४ साठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह २५ सप्टेंबरपर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com