नागपूर :- नागपूर महानगरपालिका द्वारा जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून शहरातील शौचालयांची नियमित स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता दूतांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तसा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्याकडून जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून मनपा हद्दीतील सामुदायिक शौचालय आणि सार्वजनिक शौचालयांची नियमित रित्या स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला.
तसेच शहरातील विविध सामुदायिक शौचालयांपुढे आकर्षक रांगोळी काढण्यात आली. याशिवाय शौचालयाचे देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. स्वच्छ, सुंदर, स्वस्थ व हरित नागपूर साकारण्यासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घेत शहर स्वच्छतेसाठी सक्रीय सहभागी नोंदवावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.