अजय पाटील यांना ‘मानद डॉक्‍टरेट’

नागपूर :- वनराई फाउंडेशनचे विश्‍वस्‍त, महाराष्‍ट्र राज्‍य वनसंरक्षक व वनपाल संघटनेचे अध्‍यक्ष , एशियाटीक बिग कॅट सोसायटीचे सचिव आणि बांबू सोसायटी ऑफ इंडियाचे ( विदर्भ ) अध्‍यक्ष अजय पाटील यांना अमेरिकेच्‍या डब्‍ल्‍यूडी विद्यापीठातर्फे ‘मानद डॉक्‍टरेट’ बहाल करण्‍यात आली आहे.

अजय पाटील यांनी वनविभागाचे वनमजूर, वनरक्षक, वनपाल यांच्‍यासाठी केलेले कार्य तसेच, एशियाटीक बिग कॅट सोसायटीच्‍या माध्‍यमातून वन्‍यजीव आणि वनांचे संवर्धनासंदर्भात केलेल्‍या उपाययोजना तसेच, पर्यावरण रक्षणातील त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय योगदानासाठी डब्‍ल्‍यूडी विद्यापीठातर्फे त्‍यांना यांना पर्यावरण अभ्‍यासक म्‍हणून हा सन्‍मान प्राप्‍त झाला आहे. अजय पाटील यांनी या यशाचे श्रेय वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांना दिले आहे.

वन्‍य, पर्यावरण, सामाजिक, सांस्‍कृतिक क्षेत्रातून अजय पाटील यांच्‍यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भंडारा जिल्हयाला उदयोगात अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ.प्रशांत पडोळे

Tue Jul 9 , 2024
– ईग्नाईट कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद भंडारा :- भंडारा जिल्हयात धान,रेशीम साडया, तसेच पितळीचा पारंपरिक उदयोग वाढविण्यासाठी सुक्ष्म ,मध्यम व मोठे उदयोगांना अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी केले. एमएसएमई क्षेत्रावर भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविण्यासाठी IGINTE MAHARASHTRA-2024″ या अंतर्गत जिल्हानिहाय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज नियोजन विभागात करण्यात आले होते. त्यात पडोळे बोलत होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com