संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषदचे माजी नगरसेवक श्रावण केळझरकर यांच्या कार्यकाळात सन 2001 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आला होता. आज समस्त शिवसैनिकाकडून या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करीत छत्रपती शिवाजी महारांजाचा शौर्य लढ्याचा विचार अंगीकृत केल्या जातो व दरवर्षी या चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जाते यावर्षीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रामुख्याने उपस्थित असलेले श्री राजेजी भोसले यांच्या हस्ते माजी नगरसेवक श्रावण केळझरकर यांचा सम्माण चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे,आमदार टेकचंद सावरकर, भाजप कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया, अनिल देशमुख, पंकज नालेंद्रवार, स्वप्नील रथकँटीवार, चंद्रशेखर तुप्पट, गणपतराव, दुर्गेश धोटे, नकुल धोटे, सुमित शर्मा, अर्पित कनोजिया, अनिकेत तरारे, दीपक चिंदंमवार, होनाजी वस्ताद, दिलीप करंडे, सुनील खानवानी, उदयसिंग यादव आदी उपस्थित होते.