नागपूर :-दिनांक २७.०६.२०२४ रोजी ओ. पी. जैस्वाल, विशेष न्यायाधिश पोक्सो कोर्ट, अतिरीक्त सहजिल्हा न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश, नागपुर यांनी त्यांचे कोर्टाचे स्पेशल केस क. ७६/२०२१ मधील, पोलीस ठाणे प्रतापनगर येथील अप. क. २४०/२०२० कलम ३७६ (२) (एफ), ५०६ भा.द.वि., सहकलम ६. १० पोक्सो अॅक्ट या गुन्हयातील आरोपी जिवन अजाबराव छपाने, वय ३८ वर्षे, रा. एकात्मता नगर, जयताळा, नागपूर याचे विरुध्द साक्षी पुराव्याअंती गुन्हा शाबीत झाल्याने, आरोपीस कलम ६ पोक्सोमध्ये आजन्म कारावासाची शिक्षा व ३,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०३ वर्षे अतिरिक्त कारावासाची शिक्षा, तसेच, कलम १० पोक्सो अॅक्ट अन्वये ०५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १,०००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०१ वर्षे अतिरिक्त कारावासाची शिक्षा, तसेच, कलम ५०६ भा.द.वि. अन्वये ०३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०६ महीने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.
दिनांक २७.१०.२०२० चे १४.०० वा. ते १६.०० वा. चे सुमारास, पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत राहणाऱ्या फिर्यादी यांची ०९ वर्षीय अल्पवयीन पिडीता हिला यातील नमुद आरोपीने तिचे अल्पवयीन असल्याचा फायदा घेवुन तिला आपले सोबत गाडीवर बसवुन निर्मनुष्य ठिकाणी नेवुन तिचेवर लैंगीक अत्याचार केला व कोणालाही सांगीतल्यास तिचे आई-वडील व भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे आरोपीविरूध्द गुन्हा नोंदवून, आरोपीस दिनांक ०८.११.२०२० रोजी अटक करण्यात आली होती. गुन्ह्याचे तपासी अधिकारी तत्कालीन मसपोनि स्वाती देवधर यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते.
सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून ॲडव. शहाजहान फारूख शेख यांनी तर, आरोपीतर्फे ॲडव एस. आर. भुरे यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्यात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा शेखर गायकवाड व गौतम ढोके यांनी काम पाहिले.