नागपूर :-दिनांक १०.१०.२०२४ रोजी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश क. ६ प्रमोद एल, नागलकर यांनी त्यांचे कोर्टाचे कैस क. १५/२०१८ मधील, पोलीस ठाणे सोनेगाव येथील अप. क. १४८/२०१७ कलम ३७६, ४५०, ५०६ (व) भा.द.वि. या गुन्हयातील आरोपी नामे उमेश उर्फ भुरू महादेव मानमोडे, वय २८ वर्षे, रा. नारा, ता. कारंजा, जि. वर्धा यांचे विरुध्द साक्षी पुराव्याअंती गुन्हा शाबीत झाल्याने, आरोपीस कलम ३७६ भा.दं.वि. अन्वये ०८ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०१ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा, तसेच कलम ४५० भा.द.वि. अन्वये ०५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०१ महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा, तसेच कलम ५०६ (ब) भा.द.वि. अन्वये ०३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५००/- रू. दंड आणि दंड न भरल्यास ०१ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.
दिनांक ३०.०७.२०१७ चे ०३.३० वा. ते ०५.०० वा. चे दरम्यान, पोलीस ठाणे सोनेगाव हद्दीत बांधकाम साईटवर हल्ली मुक्कामी राहणारी २५ वर्षीय फिर्यादी महीला हि आपले राहते घरी टिनाचे शेड मध्ये एकटी झोपली असतांना आरोपीने अनधिकृतपणे तिचे घरात प्रवेश करून, तिचेसोबत जबरी संभोग केला, फिर्यादी हिने आरडा-ओरड केली असता, आरोपीने तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे सोनेगाव येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपीस दिनांक ०८.०८.२०१७ चे ००.२० वा. अटक करण्यात आली होती.
गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन मपोउपनि. कदम यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. खुळे यांनी तर, आरोपीतर्फे अॅड. गंगोत्री यांनी काम पाहिले, सदर गुन्ह्यात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा, मिलींद मुडे, मधु सातपुते यांनी काम पाहिले.