घराचे स्वप्न साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त  -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- आपले स्वतःचे घरकुल असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त ठरेल. या क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिलच्या (NAREDCO) वतीने बांद्रा- कुर्ला संकुलात देशातील सर्वात मोठे ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘नारडेको’चे अध्यक्ष संदीप रुणवाल, सचिव अभय चांडक आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘नारडेको’ने देशातील सर्वात मोठे प्रदर्शन भरविले आहे. यामुळे सर्व सामान्य घर खरेदीदारांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. या क्षेत्रात वेगवेगळ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांनी प्रवेश केला आहे. घर खरेदीदारांना स्वस्त आणि चांगले घर निवडण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे. बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी ‘ महारेरा ‘ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बांधकाम क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच अशा प्रकारचे प्रदर्शन पुढील वर्षी आयोजित करावे, अशीही सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यावेळी रुणवाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor attends 219th Foundation Day of Asiatic Society

Sun Nov 26 , 2023
Mumbai :-The 219th Foundation Day of Asiatic Society of Mumbai was celebrated in presence of Maharashtra Governor Ramesh Bais at the Society’s premises in Mumbai on Sat (25 Nov). The Governor conferred the Honorary Fellowships and Medals to 8 renowned scholars on the occasion. The 91st Volume of Asiatic Society’s Journal was released by the Governor. Director General of Chhatrapati […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!