यवतमाळ, वणी, आर्णी, दिग्रस मतदारसंघात गृहमतदानास प्रारंभ

Ø दिव्यांग व वयोवृध्द मतदारांचा मतदानाला प्रतिसाद

Ø गृहमतदानास सामान्य निरिक्षक देवसेना यांची भेट

Ø जिल्ह्यात 1 हजार 588 मतदारांचे घरीच मतदान

यवतमाळ :- विधानसभा निवडणुकीत 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यांना मतदानाची घरपोच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे गृहमतदान घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 1 हजार 588 मतदार गृहमतदान करणार आहे. त्यात 1 हजार 267 वयोवृद्ध तर 321 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. आज यवतमाळ, वणी, आर्णी व दिग्रस विधानसभा मतदारसंघात गृहमतदानास प्रारंभ झाला.

यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील 305 मतदारांनी गृहमतदानाची मागणी केली होती. त्यात 85 वर्षावरील मतदार 281 तर दिव्यांग 24 मतदारांचा समावेश आहे. आज यवतमाळ शहरासह मतदारसंघात विविध पथकांद्वारे या मतदारांच्या घरी जावून त्याचे पोस्टल बॅलेटद्वारे मतदान घेण्यास सुरुवात झाली. यवतमाळ येथे मतदान सुरु असतांना मतदारसंघाच्या सामान्य निरिक्षक देवसेना यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व वयोवृद्ध मतदारांशी संवाद साधला.

वणी विधानसभा मतदारसंघात एकून 168 मतदार गृहमतदान करणार आहे. त्यात 85 वर्ष वयावरील 140 तर दिव्यांग 28 मतदारांचा समावेश आहे. या मतदारांनी रितसर अर्ज करून गृहमतदानाची मागणी केली होती. या मतदारसंघात देखील आज अशा मतदानाची सुरुवात झाली.

आर्णी विधानसभा मतदारसंघात सुद्धा आज गृहमतदान सुरु झाले. या ठिकाणी एकून 185 मतदार गृहमतदान करणार आहे. त्यात 136 मतदार 85 वर्षावरील वयाचे असून 49 मतदार हे दिव्यांग मतदार आहेत. दिग्रस विधानसभा मतदारसंघात सुद्धा आज गृहमतदान सुरु झाले. या मतदारसंघात एकू 248 मतदार गृहमतदान करणार आहेत. त्यात 144 मतदार 85 वर्ष वयाचे असून दिव्यांग मतदार 104 इतके आहेत.

राळेगाव विधानसभा मतदारसंघात देखील कालपासून गृहमतदानास सुरुवात झाली. या मतदारसंघात वयोवृद्ध 58 वर्षावरील 96 तर दिव्यांग 22 अशा 118 मतदारांनी गृहमतदानासाठी अर्ज केले होते. त्यांचे निवडणूक पथकाच्यावतीने घरी जावून मतदान घेतले जात आहे. पुसद व उमरखेड विधानसभा मतदारसंगाचे गृहमतदान संपले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदार संघाच्या विकासासाठी झटणाऱ्या देवेंद्र भुयार यांनाच संधी द्या - अमोल मिटकरी 

Fri Nov 15 , 2024
– हिवरखेड येथे आमदार अमोल मिटकरी यांच्या जाहीर सभेला विराट गर्दी !  मोर्शी :- मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रचारार्थ आमदार अमोल मिटकरी यांची जाहीर सभा गुजरी बाजार चौक येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी सभेला संबोधित करतांना म्हणाले की आपण जाती पातीच्या राजकारणात न पडता मतदार संघाच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!