संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी लोकसभा,विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नीवडणुका ह्या ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरने घेण्यात याव्या अशी मागणी कामठी येथील प्रोग्रेसीव्ह मूव्हमेंट संघटनेने केले आहे.
वास्तविकता सत्ताधारी पक्षाकडून संसदीय निवडणुकीच्या नावे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतांचा घोटाळा करीत निवडणुका जिंकल्या जात आहेत.त्यामुळे आम्ही प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट संघटनेचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते गण ईव्हीएम मशीनचा तीव्र विरोध करीत असून आगामी सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर ने घेण्यात याव्या.लोकशाहीचा चुकीचा अर्थ सांगत संसदीय निवडणुकित मतदारांच्या हक्काशी देशातील सत्ताधारी पक्ष विश्वासघात करीत आहेत.यासाठी ईव्हीएम मशीनचा माध्यम म्हणून जाणून उपयोग केला जात आहे.ईव्हीएम ने मतांचा घोटाळा करीत असून सत्ताधारी निवडणुका जिंकत आहेत वारंवार सिद्ध होऊनही ईव्हीएम मशीन वापरले जाते.त्याचा आम्ही तीव्र विरोध करीत असून आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर घ्यावेत अशी मागणी प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी चे राजेश गजभिये, प्रमोद खोब्रागडे, आशिष मेश्राम, गीतेश सुखदेवें,विकास रंगारी,कोमल लेंढारे,मंगेश खांडेकर, आनंद गेडाम,उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर, राजन मेश्राम, सुमित गेडाम,वीरेंद्र मेश्राम, सलमान अब्बास,कृष्णा पटेल, सलीम अब्बास,रायभान गजभिये, बालकदास डोंगरे, राजू खोब्रागडे, आदींनी तहसिलदार मार्फत निवडणूक आयोगाकडे केली आहे.