नागपूर : प्रजासत्ताक दिनाचा 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी पोलीस पथकाने पथसंचलन करुन मानवंदना दिली.अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.