तिडके ले आऊट च्या पंचशील व निळ्या झेंड्याची उचल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 11:- भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरानी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला. या दिवसाची आठवण म्हणून 6 डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून सर्वत्र अभिवादन वाहण्यात येतो .त्यानुसार कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रा प हद्दीत येणाऱ्या तिडके ले आऊट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तसेच बुद्ध विहार नसल्याने येथील बोद्ध अनुयायांनी येथील एका मोकळ्या जागेत झेंडा उभारून कँडल मार्च काढून बाबसाहेबांना अभिवादन वाहण्यात आले मात्र येथील पोलीस प्रशासनाच्या मदतीने दुसऱ्याच दिवशी हा पंचशील निळा झेंडा उचलण्यात आल्याचा प्रकार 8 डिसेंबरला घडला असून या प्रकारामुळे येथील बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावल्या असून ज्या महापुरुषाने या भारत देशाला भारतीय संविधान अर्पित केले आणि ते संविधान समस्त भारत वासीयांनी अंगीकृत व अधिनियमित केले आणी देशाचा राज्यकारभार ,न्यायव्यवस्था याच संविधानाच्या आधारावर चालत असले तरी याच संविधानाचे शिल्पकार असलेल्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम झालेंल्या ठिकाणच्या निळ्या ,पंचशील झेंड्याची प्रशासनातर्फे उचल करण्यात येणारा प्रकार अतिशय निंदणीय आहे.या झेंड्याची प्रशासनातर्फे पुनःश्च स्थापित करून द्यावे व वा पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी येथील जागरूक बौद्ध अनुयायी करीत आहेत.

येरखेडा ग्रा प हद्दीत येणाऱ्या तिडके ले आउट परिसरात विविध धर्मीय नागरिक वास्तव्यास आहेत.येथील नागरिक गण हे प्रतिष्ठित असून आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत असे असले तरी आजही जात गेल्याने जात नाही याचं वक्रदृष्टी बुद्धिमत्तेमुळे येथील बौद्ध अनुयायांच्या सणोत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार दिसून येतो.या परिसरात इतर धार्मिय नागरिकांसह बौद्ध समाजबांधव सुद्धा वास्तव्यास आहेत.या बौद्ध बांधवांच्या सामूहिक बुद्ध वंदनेसाठी या परिसरात बौद्ध विहार नाही तसेच महापूरुषांचा पुतळा सुद्धा स्थापित नसल्याने येथील बौद्ध समाजबांधवांची सामूहिक बुद्ध वंदनेसाठी एक प्रकारे कुचंबणाच होत असते यावर पर्यायी व्यवस्था म्हणून तिडके ले आउट च्या मोकळ्या निरुपयोगी जागेत एक लाकडी झेंडा उभारून 6 डीसेंबर ला सायंकाळी सामूहिक कँडल मार्च काढुन बाबासाहेबांना अभिवादन वाहण्यात आले तर दुसऱ्याच दिवशी स्थानिक प्रशासनाने हा झेंडा उचल करण्याचा प्रयत्न केला मात्र तेथील स्थानिक बौद्ध अनुयायांच्या मज्जावामुळे झेंड्याची उचल करणे शक्य झाले नाही मात्र 8 डिसेंबर ला हा झेंडा विना परवानगी उभारण्यात आला असल्याचे कारण दर्शवित सामूहिक बुद्ध वंदना घेऊन या निळ्या व पंचशिल झेंड्याची उचल करण्यात आली. वास्तविकता कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात असे कित्येक धार्मिक पुतळे,झेंडे,मंदिर , मुर्त्या स्थापित आहेत ते बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला जाग येत नाही मात्र एका लहानशा जागेत उभारलेल्या झेंड्याला उधळून काढण्यात प्रशासनाचा पुढकरपणा हा येथील बौद्ध अनुयायावर अत्याचार करणारा आहे तसेच यांच्या भावनांशी अपमानास्पद खेळ खेळणारा प्रकार आहे.तेव्हा येथील स्थानिक प्रशासनाने येथील बौद्ध बांधवांच्या दुखावलेल्या भावनांची जाण घेऊन त्याच ठिकाणी पुनःश्च झेंडा स्थापित करण्यात यावा वा पर्यायी सोय करून द्यावी अशी मागणी येथील तिडके ले आऊट च्या जागरूक बौद्ध अनुयायांनी केले आहे.

तिडके ले आउट च्या मालकाने एक मोकळी जागा दानास्वरूपात देण्यात आली होती या मोकळ्या जागेत एक साई मंदिर तर ग्रीन जिम उभारली आहे त्यानुसार येथील बौद्ध अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिनानिमित्त सार्वजनिक पंचशील निळा झेंडा उभारून अभिवादन वाहण्यात आले.मात्र काहींच्या डोक्यात हे खुपत असल्याने प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीवरून प्रशासनाने सदर झेंडा विधिवत पद्धतीने बुद्ध वंदना घेऊन उचल केल्याने प्रशासनाचा हा बळजबरीपणा येथील बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावणारा आहे.

मागील काही महिन्यापूर्वी याच तिडके ले आऊट मध्ये एका बौद्ध उत्सवा दरम्यान लावण्यात आलेल्या तोरणा,पताका पाडून जाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

येरखेड्यात सरपंच पदावरून राजकारण तापले

Sun Dec 11 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -सरपंच पदी कुणाची वर्णी लागणार?कांग्रेसप्रणित सरिता रंगारी की भाजपप्रणीत राजकीरण बर्वे कामठी ता प्र 11:– कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या 27 ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 18 डिसेंबरला होणार असून या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच पदाची निवड होणार आहे. यानुसार नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रा प मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रा प सरपंच पदासाठी अनुसूचित जाती खुला प्रवर्ग आरक्षित असल्याने माजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com