नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील हॉकी स्पर्धेत सीनिअर महिला गटात रायझिंग फाउंडेशनने अजिंक्यपद पटकाविले. अमरावती मार्गावरील व्हीएचवर शनिवारी (ता.14) स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.
सीनिअर महिला गटात रायझिंग फाउंडेशन ने नागपूर अकादमी संघाचा 3-0 ने पराभव करून जेतेपदावर नाव कोरले. विजेत्या रायझिंग कडून प्रेरणा बोडखेने 7व्या मिनिटाला गोल केले तर पुढे मेघा मेंढे ने 18व्या आणि 27व्या मिनिटाला दोन गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली.
सिनिअर महिला गटात तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात इआरएएम क्लबने अभिनव महिला हॉकी क्लबचा पराभव करून कांस्य पदक पटकाविले.
17 वर्षाखालील गटात मुले आणि मुलींमध्ये इरा इंटरनॅशनल स्कूल, बुटीबोरी संघाने बाजी मारली. मुलांच्या गटात इरा इंटरनॅशनल ने गटात स्कुल ऑफ स्कॉलर्स चा टायब्रेकमध्ये 5-3 ने पराभव केला.