गडचिरोली जिल्हा खुले कारागृह येथे एच आय व्ही एड्स संवेदिकरण कार्यक्रम

सतीश कुमार,गडचिरोली 

गडचिरोली,(जिमाका)दि.22: आज दिनांक 22 मार्च रोजी गडचिरोली जिल्हा खुले कारागृह वर्ग-१ येथे कारागृह अधिकारी,कर्मचारी तसेच बंदी यांच्यासाठी एच आय व्ही एड्स संवेदिकरण कार्यक्रम घेण्यात आला.संवेदिकरण कार्यक्रमास 18 अधिकारी-कर्मचारी व 12 कैदी असे एकूण 30 जण सहभागी झाले होते.
कार्यशाळेत कारागृह अधीक्षक निमगडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.भडके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग गडचिरोली, महेश भांडेकर,कु.सविता वैद्य, श्रीकांत मोडक समुपदेशक आयसीटीसी सा.रु.गडचिरोली,किशोर रामटेके समुपदेशक, यांनी जिल्हा कारागृह वर्ग-१,मध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध सेवा केंद्रे त्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा समुपदेशनाचे महत्त्व,तपासणी,उपचाराचे महत्व,आंतर विभाग समन्वय या बाबतचे मुद्दे,सहभागी कडून अपेक्षित असलेले सहकार्य, 1097 याबद्दलची माहिती व प्रश्न उत्तरे द्वारे शंका समाधान करण्यात आले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त विशेष बुद्धवंदना व धम्मदेसना

Tue Mar 22 , 2022
संदीप कांबळे,कामठी -मोफत नेत्र तपासणी शिबिर,समर्थ प्रशिक्षण शुभारंभ कामठी ता प्र 22:-आंबेडकरी चळवळीत समर्पित असलेले बिडी कामगारांचे नेते कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या 99 व्या जयंतीदिनानिमित्त उद्या 23 मार्च ला सकाळी साडे नऊ वाजता माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली व सत्कारमूर्ती महाराष्ट्र कास्ट्राईब चे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या मुख्य उपस्थितीत विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्धवंदना व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com