हिंदुस्तान कंपनीची जागा शहराच्या सार्वजनिक मुलभुत गरजा पूर्ण करण्यास आवश्यक – माजी आमदार रेड्डी 

– कन्हान-पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर २२ डिसेंबर पासुन साखळी उपोषण सुरू. 

कन्हान :- शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमीन विक्री झाल्याने कन्हान शहराच्या विकासावर आणि मुलभुत सुविधा पुर्ण करण्यावर प्रश्न निर्माण झाल्याने ही जागा शासनाने कन्हान शहराच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्यास खरेदी करावी यास्त व सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व कन्हान-कांद्री दुकानदार महासंघच्या वतीने गुरूवार (दि.२२) डिसेंबर कन्हान-पिपरी नगरपरिषद कार्यालय समोर साखळी उपोषण माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतुत्वात सुरूवात करण्यात आली. 

मागील कित्येक वर्षापासुन अनेक राजकीय व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमिन शासनाने विकत घेऊन तेथे गुजरी बाजार, आठवडी बाजार, दुकानाचे गाळे, हॉकर्स झोन, मार्केट यार्ड, भाजीपाला दुकानदार, बस स्टैंड आणि शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता उपयोगात घेण्या ची मागणी केली होती. परंतु नगरपरिषद प्रशासनाने सदर विषयाकडे गंभीर्याने लक्ष केंन्द्रीत न केल्याने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमीन खाजगी लोकास विकण्यात आल्याने कन्हान शहरात आता दुसरी कुठलिही जागा नसल्याने शहराच्या सर्वांगीण विकासावर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील कित्येक वर्षापासुन शहरात रिकामी जागा नसल्याने राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर फुटपाथ, गुजरी आणि आठवडी बाजार भरत असल्याने नागरिकांना व दुकानदाराना जिवमुठीत घेऊन सामानाची खरेदी विक्री करावी लागत आहे.

यास्तव विविध संघटनेद्वारे अनेकदा नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासन झोपेतुन जागान झाल्याने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची १८.७८ एकर जागा बाहेरील काही खाजगी लोकांना विकण्यात आल्याने शहरातील सर्वांगीण विकासावर आणि मुलभुत सुवि धा पुर्ण करण्यास आता प्रश्न निर्माण झाला असल्याने गुरूवार (दि.२२) डिसेंबर ला सकाळी आंबेडकर चौक कन्हान येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास माल्यार्पण करून नगरपरिषद सामोर साखळी उपोषण माजी आमदार  मल्लिकार्जुन रेड्डी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुकाध्यक्ष लीलाधर बर्वे, नगरपरिषद भाजपा गटनेते राजेंद्र शेंदरे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर ग्रामिण जिला उपाध्यक्ष रिंकेश चवरे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका महामंत्री मयुर माटे हया ५ मान्यवरांव्दारे उपोषण करण्यात आले. उपोषणस्थळी भाजपा किसान मोर्चा चे राजेश ठाकरे, माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे, भाजपा तालुकाध्यक्ष अतुल हजारे, जि प सदस्य व्यंकटेश कारेमोरे, नगरसेविका संगीता खोब्रागडे, सुषमा चोपकर, अनिता पाटिल, वर्षा लोंढे, वंदना कुरडकर, शैलेश शेळके, आशा पनिकर, नीलकंठ मस्के, अकरम कुरेशी, ऋषभ बावनकर, कामेश्वर शर्मा, रविन्द्र केने, फिरोज शेख सह आदी विविध पक्षाचे व संघटनेच्या १२५ नागरिकांनी भेट देऊन समर्थन दिले.

दुस-या दिवसी शुक्रवार (दि.२३) डिसेंबरला भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे न प कन्हान उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, गट नेते  मनीष भिवगड़े , नगरसेविका रेखा टोहने , गुंफा तिड़के, पुष्पा कावडकर आदी उपोषण करित असुन उपोषण स्थळी आज माजी मंत्री सुनील बाबु केदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे, सभापती मंगला निम्बोने, उप सभापती  करूणा भोवते, चंद्रपाल चौकसे, नरेश बर्वे, बलवंत पडोळे, बबलु बर्वे आदी ११० च्या वर मान्यवरांनी भेट दिली व साकळी उपोषणात केलेल्या सर्व मांगण्या लोक हिताकरीता असल्याने साकळी उपोषणाला समर्थन देऊन पाठिंबा जाहीर करण्यात आला.

कन्हान शहराच्या सार्वजनिक मुलभुत गरजा पुर्ण करण्यासाठी भुखंडाची आवश्यकता आहे. या करिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कन्हान शहरातील स्थानिक नागरिक, दुकानदार, शिक्षक, डाॅक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तमाम नागरिकाचे १० हजार पोस्ट कार्ड पाठविण्यात येणार आहे. अशी माहिती माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नागपूर मेट्रोला भेट

Sat Dec 24 , 2022
• चव्हाण यांनी तिकीट घेत मेट्रोने केला प्रवास • नागपूर आंतरराष्ट्रीय शहराच्या दिशेने :  पृथ्वीराज चव्हाण नागपूर : पूर्व मुख्यमंत्री व विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. चव्हाण यांनी सिताबर्डी इंटरचेंज ते शंकर नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला. सर्वप्रथम त्यांनी महा मेट्रोच्या मेट्रो भवनला भेट दिली. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com