हिमांशू युपकुमार पंचबुद्धे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पूर्व व पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष पदावर निवड…

नागपूर – राष्ट्रवादी  विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी 21 नोव्हेंबर रोजी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पूर्व व पश्चिम विभागाच्या उपाध्यक्ष पदी हिमांशू युपकुमार पंचबुद्धे यांची निवड करून त्यांना कृषी विभागात नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मान्यते नुसार केली आहे. विभागाचे उपाध्यक्ष हिमांशू पंचबुद्धे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांना कृषी विभागाच्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातूनच पक्ष संघटना मजबूत करतील व पक्षांचा झेंडा कृषी विद्यापीठावर लावतील व पक्ष संघटन वाढीचे काम करतील. अशी अपेक्षा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी दिलेल्या नियुक्ती प्रमाणपत्रात व्यक्त केली आहे. या नियुक्तीचे श्रेय हिमांशू पंचबुद्धेनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवा नेते ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष दुणेश्वर पेठे, विभागीय अध्यक्ष आशिष आवळे, विनोद दादा भांगे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष कृषी राहुल दादा कांबळे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपूर आदींना दिले आहे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सोमवारी जिल्ह्यात शून्य कोरोना पॉझिटिव्ह

Tue Nov 23 , 2021
रुग्ण डिस्चार्ज00 एकूण डिस्चार्ज58969 एकूण पॉझिटिव्ह60105 क्रियाशील रुग्ण03 आज मृत्यूशून्य एकूण मृत्यू1133 रिकव्हरी रेट98.11 टक्के मृत्यू दर01.89 आजच्या टेस्ट13 एकूण टेस्ट473406 भंडारा, दि. 22 : जिल्ह्यात सोमवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.22) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. सोमवारी 13 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता तीन सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58969 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60105 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 73 हजार 406 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60105 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com