नागपूर :- उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट देऊन पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.
शिबीरप्रमुख दिलीप जाधव, माहिती संचालक डॉ. राहूल तिडके यांनी प्रारंभी त्यांचे स्वागत केले. यावेळी पाटील यांनी सुयोग येथील व्यवस्थेची पाहणी केली.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे विविध निर्णय, मराठा आरक्षण, विविध प्रश्नांसंदर्भात राज्य शासनाचे प्रयत्न आदी अनेक विषयांवर मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी अनौपचारिक वातावरणात मनमोकळा संवाद साधला.