डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सहा ग्रंथाचे होणार प्रकाशन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबईदि. 21 : राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीच्या सहा ग्रंथाचे प्रकाशन दिनांक 21 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

            यावेळी परिवहन व संसदीय कार्य मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब, ऊर्जामंत्री आणि समितीचे सदस्य डॉ. नितीन राऊतउच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री व समितीचे उपाध्यक्ष प्राजक्त तनपुरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे उपस्थित राहणार आहेत.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनता’ पाक्षिक 1930 ते 1956 पर्यंत  प्रकाशित झालेल्या जनताचा दुसरा खंड आणि इंग्रजी खंड 13 चा मराठी अनुवाद डॉ. आंबेडकर : भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार’ – भाग -1 आणि भाग-2 या नवीन ग्रंथाचे प्रकाशन  होणार आहे.  इंग्रजी 13 व्या खंडाचा अनुवाद राज्यशास्त्राचे तज्ज्ञ आणि लेखक डॉ. आर. के. क्षीरसागर (औरंगाबाद ) यांनी केला  आहे.  तसेच सोर्स मटेरियलचा खंड -1 डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणेखंड-8 (Pakistan or Partision of India), खंड-10 (Dr. Ambedkar as a Member of the Governor  General’s  Executive), खंड -13 (Dr. Ambedkar as the Principal Architect of the Constitution) या 4 इंग्रजी खंडाच्या पुनर्मुद्रित  ग्रंथाचे प्रकाशन सुद्धा यावेळी होणार आहे.

            मागील काही वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीचे काम प्रलंबित होते. परंतु या वर्षापासून पुन्हा समितीने ग्रंथ प्रकाशनाच्या कामास गती देण्यात आली आहे, असेही मंत्री  सामंत यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भारत आणि बांगलादेशातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी बौद्ध धर्म सेतूचे कार्य करेल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Tue Jun 21 , 2022
मुंबई, दि. 21 : भगवान गौतम बुद्ध यांनी देशाला व जगाला शांती व प्रेमाचा संदेश दिला. भारत व बांगलादेश या देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी बौद्ध धर्म सेतूचे कार्य करेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला.   राज्यपाल कोश्यारी यांच्या  हस्ते बांगलादेशातील सर्वोच्च संघ परिषदेचे १३ वे संघराजा व बांगला भाषेतून थेरवाद बुद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी अविरत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com