संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- टेकाडी व बोरडा गावच्या शेतक-यांनी क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मौदा हयाना निवेदन देऊन टेकाडी ते बोरडा पांधन रस्त्यालगत शेतातील उच्चदाब विद्युत लाईन भुमिगत करण्याची मागणी केली आहे.
टेकाडी बोरडा पांधन रस्त्या लगत शेतात असलेली उच्चदाब विद्युत लाईन ही इतकी कमी उंचीवर आहे की, परिसरातील शेतकरी शेतमाल ट्रक्टर, ट्रॉली ने नेेआण करताना स्पर्श होऊन कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टेकाडी गावक री शेतक-याचे नेहमी शेती कामाकरिता ये-जा असल्या ने त्याना हा धोका निर्माण झाल्याने तेथील शेतक-यांनी क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे हयाना निवेदन देऊन ही उच्चदाब विद्युत लाईन भुमिगत करण्याची मागणी केल्याने खासदार बर्वे यानी दखल घेत कार्य कारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मौदा हयाना टेकाडी व बोरडा येथील शेतक-यांच्या निवेदनानुसार उच्च दाबाची विद्युत लाईनची उंची कमी असल्यामुळे वाहतुक करताना अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने मौका पाहणी करुन सदर कामाचा प्रस्ताव जिल्हा वार्षिक योजनेतुन मंजुरी करिता प्रस्ताव सादर करून अहवाल माझ्या कार्यालयात सादर करावे. असे पत्र लिहुन शेतक-यांचे समाधान केले. ही मागणी भगवानदास यादव, कृष्णा कांबळे, ज्ञानेश्वर सातपैसे, देवानंद निमकर, रामरतन निमकर, ज्ञानेश्वर नाकतोडे, नंदकिशोर निमकर, रतन कांबळे, सजय मोरे, अमित यादव, गणेश मस्के, विनोद यादव, राजु गुरधे, रामकृष्णा हुड, अमित यादव आदी सह शेतक-यांनी केली आहे.