दहावी-बारावीच्या परिक्षार्थ्यांसाठी हेल्पलाईन सेवा

नागपूर :- उच्च माध्यमिक व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परिक्षेसंबंधात परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नागपूर विभागीय शिक्षण मंडळातर्फे हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२३ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत होणार आहेत. सदर परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, प्रात्याक्षिक परीक्षा व परीक्षेसंबंधी इतर माहिती विचारणा करण्यासाठी भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांकरिता नागपूर विभागीय शिक्षण मंडळ यांचे कार्यालयाकडून हेल्पलाईन ची सुविधा उपलबध करुन देण्यात आली आहे.

इयत्ता १२वी परीक्षेकरीता विभागस्तरावर 9860330860 व 9881613998, तसेच इयत्ता १० वी परीक्षेकरीता 9834726328 व 9405669762 हे कार्यालयीन हेल्पलाईन क्रमांक आहेत. तर जिल्हास्तरावर शारदा महिला विद्यालय, ओम नगर जि नागपूर 8275039252, यशवंत विद्यालय, सेलू. जि.वर्धा 9766917338, समर्थ विद्यालय, लाखनी, जि. भंडारा 9011062355, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जि. गोंदिया 9404860735, मातोश्री विद्यालय, तुकूम,जि. चंद्रपूर 9421914353, श्री, रेणूकाबाई उके हायस्कूल, शिवराजपूर. ता देसाईगंज 9421817089 हे समुपदेशकांचे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले असन ही सेवा ११ जुलै पासून परिक्षा संपेपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. हेल्पलाईन संबंधी माहितीसाठी सहायक सचिव यांच्या 9822692103 या क्रमांकावर संपर्क करावा.

तरी नागपूर विभागातील विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी परिक्षेसंबंधी अडचणीसंदर्भात सदर जिल्ह्यानिहाय समुपदेशकांच्या हेल्पलाईनचा वापर करावा, असे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सोन्या चांदीचे दागिने चोरी प्रकरणाचा गुन्हा तडकाफडकी उघडकीस करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त

Tue Jul 11 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – तीन चोरट्याना अटक,2 लक्ष 61 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लोधिपुरा येरखेडा येथून एका कुलूपबंद घरातून 2 जून ते 5जुलै दरम्यान अज्ञात चोरट्याने 2 लक्ष 61 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असता यासंदर्भात फिर्यादी मनीषा कंगाले वय 36 वर्षे रा येरखेडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com