– शासकीय रुग्णालयात व्हीलचेअरचे वाटप
नागपूर :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. नागपुरात देखील माजी नगरसेवकांतर्फे समाजभान राखत गरजवंतांची मदत करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेवक प्रमोद(बापु) चिखले, अनिता शर्मा, मंगला पटले यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मेडिकल येथील वार्ड क्रमांक ५, ६, ७ येथे गरजवंत रुग्णांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. तसेच मेडिकलच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान व फळांचे वितरण करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. शरद कुपवार यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी संजय घाटोळ, सुनिल तायडे, अल्का तायडे, अनिल मेश्राम यांच्या सह इतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.