संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आज सकाळ पासुन सुरु झालेल्या मुसळधार पावसाने नवी कामठी प्रभाग 15 भागात पुर सदृश्य स्थिति निर्माण झाली आहे येथील रमानगर,रामगढ़,आनंद नगर, शिव नगर, विक्तु बाबा नगर,सैलाब नगर, समता नगर,सुदर्शन नगर, तथा गौतम नगर या वस्तीतील शेकड़ो घरात पाणी घुसल्याने नागरिकांच्या घरातील अन्नधान्याचे खुप नुकसान झाले.पाणी घुसण्याचे एकमात्र कारण नालयां ची स्वच्छता न होने आहे नगर परिषदच्या अधिकाऱ्याना वारंवार निवेदन करूनही अंतर्गत नालयांची मानसून पुर्व स्वच्छता करण्यात आली नाही.
एरियातील काही नागरिकांना गौतम नगर च्या नगर परिषद च्या शाळेत हलविण्यात आले.
आजच्या अतिवृष्टि ने झालेल्या नुकसानाची माहिती पुर्व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले, एस डी ओ सचिन गोसावी,तहसीलदार गणेश जगदाले,नगर परिषद चे प्रशासक संदीप बोरकर यांना दिली असून उचित मुआवजा ची मागणी करण्यात आली आहे.
– संध्या उज्वल रायबोले
माजी नगरसेविका प्रभाग 15 नवी कामठी