– नागपूर जिल्हामध्ये प्रथमच रनाळा येथे E-Liabrary करीता १.५० कोटीचा निधी मंजूर
– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे आभार
कामठी :- सरपंच पंकज साबळे यांचा युवा चेतना मंच व स्वामी विवेकानंद वाचनालय यांच्या तर्फे शाल श्रीफळ व रोपटे व आभार पत्र देऊन सत्कार करण्यात आला व संपुर्ण रनाळा ग्रामपंचायत सदस्य यांचे याप्रसंगी आभार मान्यात आले. याप्रसंगी रनाळा ग्रामपंचायतचे सचिव अमोल वाघ,उपसरपंच अंकिता तळेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे, स्वप्नील फुकटे, मयुर गणेर, आमीर खान ,अर्चना ठाकरे, सुनील चलपे, इंदु पाटील, सुनिता नंदेश्वर, मंगला ठाकरे, स्मिता भोयर, रश्मीता चौधरी,अरविंद डोंगर, या सत्कार समारोह प्रसंगी उपस्थित होते. मागील अनेक दिवसांपासून युवा चेतना मंच द्वारा संचालित स्वामी विवेकानंद वाचनालय यांच्या तर्फे अभ्यासकांना प्रसन्न वातावरणात अभ्यास करता यावा व इतर सोय सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता ई लायब्ररी ची मागणी सरपंच पंकज साबळे यांना करण्यात आली होती.
कर्तव्यनिष्ठ, ग्राम विकासाचे स्वप्न उराशी बाळगून निरंतर कार्यरत असणारे युवा सरपंच पंकज साबळे यांनी स्वामी विवेकानंद वाचनालयाला निःशुल्क खोली, अभ्यासकांना निःशुल्क पुस्तके व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांचा या सहकार्य मुळे गावातील तीन अभ्यासकांची निवड सी.आय.एस.एफ मध्ये झाली. अभ्यासकांच्या या निवडीतून प्रेरीत होऊन युवा चेतना मंच द्वारा संचालित स्वामी विवेकानंद वाचनालय यांच्या मागणीला न्याय देण्याचे ठरवले.बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे लोक नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निधीतून दीड कोटी ची ई लायब्ररी मंजूर करून आणली. या ई लायब्ररी मधे वाय- फाय, पुस्तकं फर्निचर, प्रशस्त बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, इतर अत्य आवश्यक सुविधा उपलब्ध असतील. परीसरातील युवा अभ्यासकांना ई लायब्ररी उपलब्ध करून दिल्या बद्दल युवा चेतना मंच तर्फे सरपंच पंकज साबळे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रस्तावना प्रा.पराग सपाटे व आभार अक्षय खोपे यांनी केले अमोल नागपुरे, बाॅबी महेंद्र, हिमांशू लोंडेकर, शशांक कुकडे आदी युवा चेतना मंच सदस्य उपस्थित होते.