अमरदिप बडगे, प्रतिनिधी
जिल्ह्यात येलो अलर्ट मध्ये येत्या दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता; गोंदिया सह दोन तालुक्यात अतिवुष्टी
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसा परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असुन जिल्ह्यात मुसळदार पाऊस सुरु असुन गोंदिया तालुका सह दोन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तर येत्या दोन दिवस सुद्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण व पाऊस सुरु असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर गोंदिया जिल्हा हा येलो अलर्ट मध्ये असुन आज हि अनेक ठिकाणी मुसळदार पाऊस सुरूच आहे. तर होत असलेल्या पावसाने जिल्ह्यात गारवा निर्माण झाला आहेत. तर दुसरी कडे शेतकरी पुन्हा चिंतेत आला आहे.