संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20 :- सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देत येत्या दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले होते तसेच राज्य निवडणूक आयोगाने आदेशीत केलेल्या सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम 2022 नुसार कामठी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी कामठी नगर परिषद तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर इच्छुक नागरिकांना 10 ते 14 मे 2022 च्या कार्यालयीन वेळेपर्यंत कामठी नगर परिषद कार्यालयात सूचना , हरकती व आक्षेप लेखिस्वरूपात नोंदवन्याचे आव्हान करण्यात आले होते यानुसार 14 मे आक्षेप नोंदविण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत एकूण 45 आक्षेपकर्त्यांनी प्रसिद्ध प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदविला. या आक्षेपावर 23 मे पर्यंत जोल्हाधिकारी सुनावणी घेणार असून यातील प्रस्तावित प्रभाग क्र 15 च्या रमानगर भागावर आलेल्या आक्षेपकर्त्यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात नगर परिषद कामठी प्रभाग रचना वर आक्षेप बाबत सुनावणी जिल्हाधिकारी आर विमला यांच्या समक्ष घेण्यात आली.
प्रस्तावित प्रभाग 15 आणि 16 तील रमानगर भाग चा समावेश यावर सर्वाधिक चर्चा झाली.याप्रसंगी ,निरज लोणारे, उज्ज्वल रायबोले, प्रमोद खोब्रागडे यांनी याबाबत जिल्हाधिकारी महोदयांचे लक्ष वेधले आणि नागरी सुविधा व प्रशासकीय सुविधा साठी रमानगर हा भाग प्रस्तावित प्रभाग 15 मध्ये जोडण्या बाबत सूचना केल्याबाबत राज्य निवडणूक आयोग कडून मार्गदर्शन घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी महोदयांनी दिले
यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी ए आर पंत, मुख्याधिकारी संदिप बोरकर, प्रभाग रचना समितीचे सदस्य प्रदीप भोकरे, विक्रम चव्हाण, विजय मेथीया, संगणकतज्ञ विभा जांभुळकर उपस्थित होते.
गुगल मॅप आणि 2011 ची जनगणना चा आधार घेऊन प्रभाग रचना बनविली असून प्रस्तावित प्रभाग 16 हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय मोठा प्रभाग असून रमानगर भाग वगळून हा प्रभाग ची रचना करावी असे मत आक्षेप घेणाऱ्यानी जिल्ह्याधिकारी महोदयां कडे मांडले न्याय न मिळाल्यास याबाबत कायदेशीर बाजू राज्य निवडणूक आयोगा कडे मांडू असे आक्षेपकर्त्यानी स्पष्ट केले
कामठी नगर परिषद चा पंचवार्षिक कार्यकाळ संपला असून यावर प्रशासक कार्यरत आहेत.प्रशासक नेमल्यानंतर सहा महिण्याच्या आत संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन पदाधिकारी विराजमान होणे आवश्यक आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या 22 फेब्रुवारी 2022 च्या परिपत्रकानुसार नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता .त्यानुसार कामठी नगर परिषद च्या वतीने 10 मार्च 2022 ला एकूण 17 प्रभागाची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती व त्यासाठी 10 मार्च ते 17 मार्च पर्यंत हरकती, आक्षेप व सूचना नागरिकांकडून मागविण्यात आल्या होत्या त्याप्रसंगी एकूण 10 अर्जदारांनी आक्षेप नोंदविला होता.मात्र वेळीच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेत राज्य शासनाने यात खोडा घातला व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते.त्यावर 11 मार्च ला या प्रभाग रचनेवर स्थगिती आणण्यात आली. यावर सर्वोच्च न्यायालयाने 4 मे 2022 ला दिलेल्या सुनावणी निकालात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या व येत्या दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.त्यात सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम दीला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कारवाही 10 मार्च 2022 रोजी असलेल्या टप्प्यापासून सुरू करावी असा आदेश 4 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता .त्यानुसार निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कारवाहीच्या पाश्वरभूमीवर कामठी नगर परिषद कार्यालयात प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे.त्यावर इच्छुक नागरिकांना 10 मे ते 14 मे या कालावधीत आक्षेप, हरकती, सूचना नोंदविणे यावर 23 मे 2022 पर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी देनार आहेत .तसेच जुन्या प्रभाग रचना कार्यक्रमा दरम्यान 10 मार्च 2022 कार्यक्रमानुसार त्यावेळी नोंदविलेल्या आक्षेप, हरकती व सूचना वर एकत्रित सुनावणी घेण्यात येत आहे.तर अंतींम प्रभाग रचना 7 जून 2022 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल.