आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास आवश्यक – मंत्री अमित देशमुख

मुंबईदि. 19 : वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या कार्यप्रणालीत सुलभता आणि एकसमानता आणण्यासाठी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा (एच.एम.आय.एस.) अभ्यास करण्यात यावा, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली (एच.एम.आय.एस.)याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी  एच.एम.आय.एस याबाबत सादरीकरण केले. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजयवैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंहवैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकरउपसचिव प्रकाश सुरवसे  उपस्थित होते.

             देशमुख म्हणालेवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित रुग्णालयांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय माहिती निर्माण करणे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व शैक्षणिक बाबींमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणे ही गरज आहे. त्यामुळेच येत्या काळात या विभागासाठी आवश्यक सॉप्टवेअरचे विश्लेषणमॉड्युल्सची संख्यावापर करण्याची सुलभता आणि एकसमानता या पर्यायांचा सांगोपांग विचार करुनच राज्यामध्ये सर्वंकष अशी एकच एच.एम.आय.एस. कार्यप्रणाली विकसित होणे आवश्यक आहे.

            केंद्र शासनाने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ही योजना 27 सप्टेंबर 2021 पासून संपूर्ण देशात कार्यान्वित केली आहे. या योजनेमध्ये आरोग्याशी संबंधित सर्व घटकांचा जसेरुग्णालयक्लिनिक्सप्रयोगशाळाफार्मसिजरेडिओलॉजी सेंटर्स इत्यादीचा समावेश असणे आवश्यक आहे असे नमूद केले आहे. एच.एम.आय.एस कार्यप्रणालीचा वापर करताना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील संस्थांमध्ये आवश्यक सॉप्टवेअर आणि हार्डवेअरआवश्यक कुशल मनुष्यबळ यांची आवश्यकता असणार आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने सी-डॅक (C-DAC) यांच्याकडून रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचा प्रस्ताव मागितला असून याबाबतचा पूर्ण अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही मंत्री देशमुख यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आझादी का अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त कार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्यात यावी - मंत्री अमित देशमुख

Tue Apr 19 , 2022
मुंबई, दि. 19 : आझादी का अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राचा हिरक महोत्सव यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. हे आयोजन करीत असताना निश्चित कार्यक्रम ठरवून या कार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्यात यावी, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.             मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com