मनपाच्या स्वच्छता दूतांची आरोग्य तपासणी

नागपूर :- स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. संपूर्ण शहराची स्वच्छता राखणे हे घराची व परिसराची स्वच्छता राखण्या इतकेच महत्त्वाचे आहे. शहर स्वच्छतेची जबाबदारी नित्यनियमाने पार पाडणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अर्थात सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे “सफाई अपनाओ, बीमारी भगाओ” अभियांतर्गत मंगळवारी (ता:२७) घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्व स्वच्छता दुतांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या दहाही झोन निहाय येणाऱ्या विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले. जवळपास सर्वच सफाई कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

यात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत सोमलवाडा युपीएचसी, धरमपेठ झोन अंतर्गत फुटाळा युपीएचसी, हनुमाननगर झोन अंतर्गत मानेवाडा युपीएचसी, धंतोली झोन अंतर्गत बाबुलखेडा युपीएचसी, नेहरू नगर झोन अंतर्गत नंदनवन युपीएचसी, गांधीबाग झोन अंतर्गत भालदार पुरा युपीएचसी, सतरंजीपुरा झोन अंतर्गत शांतीनगर युपीएचसी, लकडगंज झोन अंतर्गत पारडी युपीएचसी, आशीनगर झोन अंतर्गत शेंडे नगर युपीएचसी, मंगळवारी झोन अंतर्गत इंदोरा युपीएचसी येथे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाद्वारे मोरभवन बस स्थानकावर मुरूम टाकून समतलीकरण मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार कार्यवाही

Thu Aug 29 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मोरभवन बस स्थानकावरून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. पावसामुळे मोरभवन बस स्थानक परिसरात चिखल आणि पाणी साचल्याने होत असलेल्या त्रासाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार लोककर्म विभाग व हॉटमिक्स प्लाँट विभागाद्वारे मोरभवन बस स्थानक परिसरात मुरूम टाकून समतीलकरणाचे काम करण्यात सुरु आले आहे. काही दिवसांपूर्वी सतत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com