पारधी बेड्यामध्ये दवाखाना आपल्या दारी अंतर्गत आरोग्य तपासणी मोहीम

▪️सूमारे 7 हजार पारधी लोकांना तपासणीचे उद्दिष्ट

▪️जिल्हा परिषदेचा पुढाकार 

नागपूर :– पारधी समाजातील पात्र असलेला कोणताही लाभधारक शासनाच्या लोककल्याणकारी योजनांपासून वंचित राहता कामा नये या उद्देशाने जिल्हा परिषद व आदिवासी विभागातर्फे जिल्ह्यातील 42 पाड्यांवर “दवाखाना आपल्या दारी” ही मोहीम राबविण्यात आली. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गत आठवड्यात याबाबत निर्देश देऊन विविध शिबीरे घेण्याच्या सूचना केल्या होत्या.

नागपूर जिल्ह्यात सूमारे 42 पारधी बेड्यांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो. आदिवासी पारधी लोकांची जिल्हयातील संख्या ही सूमारे 7 हजार पेक्षा अधिक आहे. या लोकांपर्यंत कोणत्या शाासकीय योजना पोहचल्या, किती व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेतला, किती वंचित आहेत याबाबत आदिवासी विभागातर्फे सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणानंतर प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुरुप विविध योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अडाण कालव्याच्या विशेष दुरुस्तीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

Tue Jan 28 , 2025
यवतमाळ :- अडाण नदी प्रकल्पाच्या कालव्यांची विशेष दुरुस्ती केली जात आहे. दुरुस्तीच्या कामातील अडथळे व काम तातडीने होण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल भवन येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांच्यासह जलसंपदा, विज वितरण, वन, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अडाण नदी प्रकल्प वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात अडाण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!