सफाई कर्मचारी महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती

जागतिक महिला आरोग्य दिनानिमित्त मनपाचा पुढाकार

नागपूर :– नागपूर महानगरपालिकेद्वारे महिलांच्या आरोग्यासंबंधी जागृतीकरिता दहाही झोनस्तरावर जागतिक महिला आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा आरोग्य चमू आणि स्वच्छता विभागाच्या अधिका-यांमार्फत आरोग्याप्रति जनजागृती करण्यात आली.

दरवर्षी २८ मे रोजी महिलांच्या आरोग्यकरिता जागतिक महिला आरोग्य दिवस साजरा केला जातो. ‘महिलांचे आरोग्य आणि अधिकार : एक सुरक्षित आणि स्वस्थ भविष्याकडे’ ही यावर्षीची जागतिक महिला आरोग्य दिनाची थीम आहे. या कार्यक्रमादरम्यान सर्व महिला सफाई कर्मचारी, एसएचसी महिला आणि समाजसेवी संस्थांसह जनजागृती करण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

महिलांना आरोग्य सेवांचे महत्व आणि त्यांचा लाभ घेण्याविषयी जागरूक करणे, महिलांच्या आरोग्य अधिकारांची सुरक्षा आणि त्याविषयी माहिती देणे, शासन आणि आरोग्य संघटनांना महिलांच्या आरोग्य सेवेमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणे, समाजात महिलांच्या आरोग्यासंबंधी प्रश्नांवर मोकळेपणाने चर्चा करणे आणि त्याच्या समाधानाच्या दृष्टीने कार्य करणे या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमात स्वच्छतेविषयी महत्वाची माहिती देण्यात आली. महिलांना सॅनिटरी पॅडचा योग्य उपयोग करण्याविषयी माहिती देताना त्यांना कापडाचा उपयोग न करण्याबाबत जागरूक करण्यात आले. संक्रमणापासून बचावासाठी सॅनिटरी पॅड आणि स्वच्ठछतेच्या मानकांचे पालन करण्याबाबत माहिती देण्यात आली. घरातून निघणारा ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा संकलीत करून ४ कचरा पेट्यांच्या माध्यमातून कचरा गाडीमध्ये टाकण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ओल्या कच-यापासून होम कम्पोस्टिंगच्या माध्यमातून खत निर्मिती करून त्याचा उपयोग घरातील बागेत करण्याबाबत देखील जागरूक करण्यात आली. सिंगल यूज प्लास्टिकचा उपयोग न करण्याबाबत सतर्क करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नाल्यावरील अतिक्रमणावर मनपाद्वारे कारवाई  

Wed May 29 , 2024
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाविरुद्ध सुरु केलेल्या कारवाईत आज अनेक भागातील नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले. सवारी बंगला,जटपुरा गेट तसेच तुकूम येथील नाल्यावरील अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात येऊन अतिक्रमण धारकांना पुन्हा अतिक्रमण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. अनधिकृत बांधकामांना थारा न देण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले असून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!