संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- हरदास नगर अर्बन क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर च्या वतीने ७१वा, “अखिल भारतीय सहकार सप्ताहाच्या निमित्ताने पत संस्थेची ओळख व्हावी व संस्था परिवारातील घटकांना त्यांच्या उद्योग आणि व्यवसायाला चालना मिळावी या हेतुने दिनांक१४.११.२०२४रोजी, संस्था कार्यालय परिसरात, यादव नगर, मोहम्मद रफी चौक, नागपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शेखर चरेगावकर (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, पुणे) यांचे शुभहस्ते सप्तरंगी सहकार ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, भदंत नागदिपंकर महास्थविर व विशेष अतिथी राजेंद्र घाटे( अध्यक्ष, नागपुर जिल्हा पत संस्था व कर्म.पत संस्था सह. संघ मर्या. नागपूर) यांचे हस्ते मुख्य अतिथी समवेत, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाबु. हरदास एल. एन. यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्था उपाध्यक्ष, विजय नागदेवे यांनी संस्थेच्या सुरुवातीपासुन आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती देऊन संस्थेच्या विवीध उपक्रमाविषयी माहिती दिली व संस्था भविष्यकालीन विकासकामांचा उपक्रम सुद्धा कार्यक्रमात विषद केला.
मुख्य अतिथी शेखर चरेगावकर यांनी संस्था प्रगतीकरिता मोलाचे मार्गदर्शन केले व उपस्थीत सर्व सभासदांना सहकाराचे महत्त्व पटवून दिले. संस्थेला भविष्यातील कार्यप्रणाली करिता शुभेछ्या देत, संस्था प्रगतीची भरभरून प्रशंसा केली.
विशेष अतिथी राजेंद्र घाटे यांनी संस्थेच्या दिवसेंदिवस वृध्दींगत प्रगती बाबत प्रशंसा करून उपस्थित सर्व सभासदांना ठेवी व आर्थिक व्यवहार आपल्या संस्थेचे वतीने करण्यासंबधी सांगितले व संस्थेचे लेखापरीक्षण वर्गीकरण “अ” दर्जा प्राप्त असल्याचे सुचविले. त्याचप्रमाणे ७१ व्या, “अखिल भारतीय सहकार सप्ताह” निमित्ताने आपल्या संस्थेचे प्रेरणास्थान, बाबु हरदास एल. एन. यांचे सहकारातील कार्य ध्यानात घेऊन संघाच्या वतीने आदर्श संस्था पुरस्कार बाबूंची कर्मभूमी, तालुका – कामठी करिता बाबु. हरदास एल. एन. या नावाने देण्याबाबत घोषणा केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत नागदीपंकर महास्थविर यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले की, सहकार धोरण हे नागरिकांच्या दैंनदिन जीवनात अतिशय महत्वाचे आहे. हरदास नगर अर्बन क्रेडिट को-ऑपेटिव्ह सोसायटीच्यावतीने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सभासदांचे सोबतच गरजु नागरिकांना सुध्दा मुलभूत सुविधा पुरवून मदत करण्यात येत आहे. हि अतिशय आनंदाची बाब आहे. नुकतीच स्थापन करण्यात आलेल्या, बाबु हरदास एल. एन. बहुद्देशीय संस्थेची माहिती देऊन संस्थेच्या उद्देशांची रूपरेषा कार्यक्रमात सांगितले.
याप्रसंगी संस्थेच्या सर्व सभासदांना, हितचिंतकांना भेटवस्तु सुध्दा देण्यात आल्यात व सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे अध्यक्ष, कृष्णराव मंडपे व्यवस्थापक रविंद्र राऊत आणि संपुर्ण संचालक मंडळाचे व उपस्थित मान्यवर सुधीर माने, आनंद लोणारे, मंगेश सातपुते, किरण रोकडे, सागर मेश्राम, जे. ई. शेंडे, सुरेश शेंडे, सुरेश बिनेकर, शेखर निमजे, डॉ. विद्यानंद गायकवाड, शंकर अंबादे, राजन सांगोळे, धर्मदास मेश्राम व यादव नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, महिला मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे मंच संचालन व आभार प्रदर्शन मान. सुनील गजभिये यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.