हरदास घाट स्मारक परिसराची दुरावस्था अजूनही कायमच!

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  

कामठी तालुका वार्तापत्र 

कामठी ता प्र 22 :- बिडी मजदूरांचे हृदय सम्राट ऍड ना.ह.कुंभारे उपाख्य दादासाहेब कुंभारे यांचा बिडी मजदूरांच्या सर्वांगीण विकासासाठी लढा देत असताना 14 ऑक्टोबर 1982 ला गोंदिया शहरात सकाळी 6 वाजता प्रवासाने जात असताना वाटेतच त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते तसेच कन्हान नदिच्या पैलतिरी विद्रोहाचे पाणी पेटवणारे जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबु हरदास एल एन. यांचा १२ जानेवारी १९३९ साली वयाच्या ३५व्या वर्षी निधन झाले. या दोन्ही मान्यवरांचा दफनविधी कन्हान नदिच्या पैलतिरी आर्मी सेक्टर च्या जागेवर करण्यात आला होता… उपरोक्त जागेवर १५जानेवारी१९४०पासुन हरदास स्मृती स्मारक समिती च्या वतीने स्मृतीभुमी हरदास घाट कन्हान नदिच्या तिरावर हरदास मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो तर आंबेडकर चळवळीला ऐतिहासिक व प्रेरक असनाऱ्या या अभिवादनीय स्मूर्तीस्थळावर असलेल्या स्मारकाची दुरावस्था सुव्यवस्थेअभावी अजूनही कायमच आहे, ज्याकडे संबंधित प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या अभिवादनिय हरदास घाट स्मारक ची असलेली दुरावस्थामुळे येथील आंबेडकरी चळवळीतील नेते., कार्यकर्ते आणी अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत तेव्हा आंबेडकरी अनुयायांची प्रेरक शक्ती स्थळांची होत असणारी अनास्था थांबविण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याची भूमिका घेणे गरजेचे आहे …तेव्हा या अभिवादनिय हरदास घाट स्मारकाची दुरावस्था केव्हा दूर होणार?असा प्रश्न येथील आंबेडकरी अनुयायी करीत आहेत.

जयभीम नाऱ्याचे जनक बाबू हरदास एल एन तसेच बिडी मजदूरांचे हृदय सम्राट ऍड ना ह कुंभारे यांनी कामठी शहरात राहून केलेल्या क्रांतितून आपले नाव अजरामर करीत सर्वांचा शेवटचा निरोप घेतला असला तरी या मान्यवरांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 15 जानेवारी ला या हरदास घाटावर हरदास मेळाव्याच्या माध्यमातून अनुयायी वर्ग मोठ्या संख्येत या दोन्ही मान्यवरांच्या स्मूर्तीस्थळी अभिवादन वाहतात या मेळाव्याला जवळपास 82 वर्षे लोटत आहेत मात्र अजूनही या परिसराचे पाहिजे तसे सौंदर्यीकरण करण्यात आले नसून उलट या स्मारकाची दुरावस्था होत आहे तेव्हा संबंधित प्रशासनाने या हरदास घाट स्मारकाच्या दुरावस्थेची स्थिती लक्षात घेत सुव्यवस्थेकडे लक्ष पुरवावे अशी मागणी येथील आंबेडकरी अनुयायी वर्ग करोत आहे.

कन्हान नदीच्या तीरावर असलेल्या या हरदास घाट नावाने संबोधित असलेल्या नावाला संपुष्टात आणण्यासाठी काहींनी याला वैकुंठ धाम तर कुणी शांतिघाट या नावाने संबोधून हरदास घाट नावावर सर्रास अतिक्रमण करण्याचा प्रकार सूरु केला आहे.बाबू हरदास यांचे सहकारी गौरीशंकर गजभिये यांनी बाबू हरदास यांच्या स्मूर्तीभूमीला प्रकाशमय करण्याहेतु बाबू हरदास यांच्या समाधी स्थळी हरदास यात्रा सुरू केली होती .त्यानुसार दरवर्षी 15 जानेवारीला विदर्भातील आंबेडकरी अनुयायी 15 जानेवारी च्या हरदास मेळावा यात्रेत सहभागी होतात.

हरदास घाट स्मारक परिसरात 15 बाय 15 च्या जागेत बाबू हरदास एल एन तसेच ऍड दादासाहेब कुंभारे यांचे समाधीस्थळ असून या समाधी स्थळाच्या उत्तर व दक्षिणेस बाबू हरदास यांचे कट्टर समर्थक मेंढे गुरुजी व नागपूर चे माजी महापौर सखाराम मेश्राम यांचीसुद्धा समाधी स्थापित आहे हे इथं विशेष!.या हरदास घाट स्मारक परिसरात दरवर्षी हरदास स्मूर्ती समिती, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक समिती आदी संघटनेच्या वतीने निघणाऱ्या या हरदास मेळाव्याची व्यवस्था करण्याहेतु कामठी नगर परिषद ची जवाबदारी आहे आणि तसा प्रस्ताव 1996 मध्ये कामठी नगर परिषद मध्ये मंजूर ही करण्यात आला होता त्यानुसार कामठी नगर परिषद तसेच छावणी परिषद ने या हरदास घाट स्मारक परिसराच्या दुरावस्थेकडे गांभीर्याने लक्ष पुरवून लवकरात लवकर सुव्यवस्था करून सौंदर्यीकरण करावे तसेच हरदास मेळाव्यात सहभागी होणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी लागणाऱ्या मुबलक सोयी सुविधा,पिण्याच्या पाण्याची सुविधा,अस्थायी स्वच्छता गृह,विविध रोषणाई करून सुविधा पुरवाव्या अशी मागणी येथील आंबेडकरी अनुयायी करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा विचार नाही - दीपक केसरकर

Fri Dec 23 , 2022
नागपूर :- राज्यातील २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासनस्तरावर घेण्यात आलेला नाही, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच, लवकरच शिक्षक आणि शिक्षकेतर पद भरतीची प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. विधानसभा सदस्य अमित देशमुख यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री दीपक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!