वर्धा, १० डिसेंबर २०२४: न्यु ईग्लीश हायस्कूल वर्धा येथे १९९२ मध्ये दहावीच्या वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा नुकताच शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. ३३ वर्षांनंतर वर्ग मित्र-मैत्रीणी एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेतला.
या सोहळ्याला त्यावेळी दहावीच्या वर्गशिक्षक असणारे नगराळे सर (सेवानिवृत्त) आणि त्यांच्या सौभाग्यवतींना शॉल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सध्याचे शाळेचे प्राचार्य सौ. अनधा आगवन मॅडम होत्या, तर उपप्राचार्य जुगनाके सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लतीका पंचभाई (देशपांडे) यांनी केले, तर प्रास्ताविक सौ. शिल्पा चौधरी (परसोडकर) यांनी केले.
कार्यक्रमात वर्ग मित्र-मैत्रीणींच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी, जे वर्ग मित्र आता हयात नाहीत, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात शाळेच्या प्रांगणात वृक्षरोपणाचा छोटेखानी कार्यक्रम देखील पार पडला, ज्याने शाळेच्या आवारात नवा जीवनरंग भरला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन हांडे यांचे विशेष योगदान होते. माजी विद्यार्थ्यांनी गुजरात, मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यांमधून येऊन या सोहळ्यात सहभागी होऊन त्याचा शोभा वाढवला. प्रमुख उपस्थितीमध्ये हे मित्र व मैत्रिणी होते:
अजय कैकाडे, अरविंद भगत, प्रशांत केळकर, गिरीश सावरकर, किशोर भोकरे, संदीप सोगे, सुनिल कुर्भालकर, राजेश कुटे, किरन चन्ने, रविंद्र अलोने, राजु बोरकर, सतीश गेडाम, मिलींद उपाध्याय, प्रशांत धापुलकर, जगदीश गुदलीयार, राजु बोरकर, दुधाने उपस्थित होते
महिला उपस्थितीमध्ये प्रमुख होत्या:
सौ. शिल्पा चौधरी (परसोडकर), सौ. लतीका पंचभाई (देशपांडे), सौ. वर्षा फटींगे (मुधोळकर), सौ. निलीमा गोटे (लोहकरे), सौ. शितल भेंडे (ठाकरे), सौ. वैशाली वरटकर (देवढे), सौ. आसावरी फालके (मिसाळ), सौ. प्रज्ञा मुलमुले (शिंगोटे), सौ. नेत्रा व्यास (गांधी), सौ. माधुरी पांडे, सौ. संगीता मापारी, सौ. निलीमा भादंकर, सौ. स्वाती लोखंडे, सौ. सारीका उपासे, सौ. मोना महाकाळक्कर, सौ. मेघा राउत उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, तरीही शाळेतील आणि जीवनातील काही प्रिय मित्रांच्या गैरहजेरीचा शोकही व्यक्त झाला. हे पुनर्मिलन सर्वांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरला.