– सामाजिक दायित्वाप्रति व्यक्त केली कृतज्ञता
नागपूर : अनाथांना सोबतचे पालकत्व, रुग्णांच्या नातेवाईकांना अत्यल्प दरात जेवण या आणि अशा अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे सामाजिक दायित्व जोपासणारे नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांचा वाढदिवस शनिवारी (२० ऑगस्ट) विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला.
नागपूर शहरातील विविध भागात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, लहान मुलांना मिनी टॅबचे वितरण, सहजीवनाची २५ वर्षे पूर्ण केलेल्या दाम्पत्यांचा सत्कार, दीनदयाळ थाली मार्फत मोफत जेवण, लहान मुलांकरिता डिजिटल स्केच स्लेट (टॅब) वाटप, सफाई कामगारांना आयुष्मान भारत योजना आणि ई श्रम कार्डचे वितरण, आरोग्य शिबिर, शासकीय जनकल्याण योजना शिबिर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
माजी महापौर संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त मेडिकल काॅलेज परीसरातील दीनदयाल थाली केंद्रातून सर्व लाभार्थ्यांना निःशुल्क भोजन वितरण करण्यातआले. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांची प्रमुख उपस्थिती होती. वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणेच संदीप जोशी यांनी श्रद्धानंद अनाथालयाला भेट दिली व चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा केला.
प्रभाग १६ मध्ये माजी नगरसेवक लखन येरावर यांच्यामार्फत प्रभागातील सहजीवनाला २५ वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपा प्रभाग क्र. ४२ तर्फे माजी नगरसेविका सौ. वनिता दांडेकर यांच्या पुढाकाराने सुद्धा सहजीवनाला २५ वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान माजी नगरसेविका सौ. वनिताताई दांडेकर यांनी दीनदयाल थाली प्रकल्पासाठी सहकार्य राशी सुपूर्द केली. प्रभाग ३३ मध्ये माजी नगरसेविका विषाखाताई बांते यांचेद्वारे लहान मुलांना मिनी टॅबचे वितरण करण्यात आले. माजी नगरसेवक नागेश मानकर यांचेद्वारे भगवान नगर येथे जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
माजी नगरसेवक संदीप गवई यांनी त्यांच्या कार्यालयात गरजू शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून संदीप जोशी यांचा वाढदिवस साजरा केला. भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग ३४ मधील बूथ क्र. ९५ च्या महामंत्री आणि निःस्वार्थ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष अनिता शर्मा यांच्याकडून विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. वाढदिवसाच्या औचित्याने सचिन देशमुख यांनी सी.के.पी. हाॅल, रामनगर येथे त्यांच्या लुडस फिटनेस सेंटरचे संदीप जोशी यांच्या हस्ते उद्घाटन केले.
प्रभाग क्र. ४३ चे महामंत्री, शहर संपर्क प्रमुख राम अहिरवार यांच्या पुढाकाराने नागपूर शहर अनुसूचित जाती मोर्चाद्वारे लहान मुलांकरिता डिजिटल स्केच स्लेट (टॅब) वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्ताने माजी नगरसेवक विजय चुटेले यांच्या द्वारे बाह्य संपर्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
एस.बी.एम. विकास सेवा संस्थेद्वारे आयोजित सफाई कामगार संमेलनात आयुष्मान भारत योजना आणि ई श्रम कार्डचे निःशुल्क शिबिर घेण्यात आले. या शिबिराला संदीप जोशी यांनी भेट दिली. यावेळी सफाई कामगारांचे अध्यक्ष सतीश सिरसवान, संतोष तुर्केल, नूतन शेंदुर्णीकर, नितीन वामन आदी उपस्थित होते. एस.बी.एम. विकास सेवा संस्थेने सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून कोरोना पिडीत परीवारांतील महिलांना सहकार्य म्हणून स्पृहणीय उपक्रम सुरू केले. याबद्दल जोशी यांनी संस्थेचे विशेष अभिनंदन केले. एस.बी.एम. विकास सेवा संस्थेद्वारे मनपा मध्ये सेवारत सफाई कामगारांचे संमेलन आयोजित करण्यात आले. संमेलनप्रसंगी सफाई कामगारांसाठी आयुष्यमान भारत व ई श्रम कार्ड या योजनासंबधी निःशुल्क शिबिर घेण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष पारेन्द्र पटले यांच्यातर्फे निःशुल्क शासकीय जनकल्याण योजना शिबिर घेण्यात आले. प्रभाग क्र. ४१ च्या सर्व जेष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत संदीप जोशी यांना शुभेच्छा दिल्या.
गरजू आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छाशक्ती असलेल्या कर्तृत्ववान महिलांना संदीप जोशी यांच्या जन्मदिनानिमित्त आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये विद्या सोनवणे यांना पार्लर चेअर, चांदणी साहू यांना, सायकल, ललीता भारती यांना गॅस कनेक्शन आणि
माधूरी डायरे यांना स्टेशनरी सामान देण्यात आले.
राजमुद्रा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि भाजपा क्रीडा आघाडीचा वतीने शहरातील क्रीडा क्षेत्रात नवीन नावलौकिक प्राप्त क्रीडा मंडळांना आणि क्लबला जन्मदिनानिमित्त क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. सुरज येवतीकर, लक्ष्मीकांत जी, सुनील मानेकर, सतीश वडे, पियुष आंबुलकर, केतन ठाकरे, किशन चौधरी, संदेश खरे, गुरुदास राऊत, प्रकाश चंद्रायन आदी उपस्थित होते. कार्यक्रमात नेहरू युवा क्रीडा मंडळ, दिघोरी, अम्मा फुटबॉल क्लब, लक्षवेध क्रीडा मंडळ, नरेंद्र नगर, खंडन स्पोर्टींग क्लब, बाल सदन, सदर या क्रीडा मंडळांना क्रीडा साहित्य वितरित करण्यात आले.
सामाजिक कार्यक्रमासह शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य यासोबत शासकीय योजना या संदर्भातील उपक्रमांद्वारे नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना स्वतः संदीप जोशी यांनी भेट देऊन सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला व आभार मानले.