संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14 :- येत्या 18 डिसेंबर ला कामठी तालुक्यातील गादा ग्रामपंचायत च्या सरपंच व सदस्य पदाची निवडणूक असून या निवडणुकीच्या तोंडावर गावातील एका इसमाने वात नामक आजाराला कंटाळून गावाच्या पलीकडे असलेल्या नदीच्या कडेच्या एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6 वाजता निदर्शनास आली असून मृतकाचे नाव गोविंदराव भोयर वय 60 वर्षे रा गादा तालुका कामठी असे आहे.
सदर मृतक हा मासेव्यवसायी असून असलेल्या वाता च्या आजाराने कंटाळून गेला होता याच वाताच्या आजाराला कंटाळून सर्व घरमंडळी गाढ झोपेत असल्याचे संधी साधून सदर मृतकाने घराबाहेर पडून नदी कडेला असलेल्या निंबा च्या झाडावर चढून नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती नवीन कामठी पोलिसांना कळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आक्समिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर मृतकाच्या पाठीमागे कुटुंबात चार मुली व दोन मुले असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.