मुंबई :- सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या ‘दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करणे’ या योजनेंतर्गत उद्योग, कामगार व खनिकर्म विभागातील दिव्यांग कर्मचारी कु. रिना बारेला यांना स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण आज प्रदान करण्यात आले. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम झाला. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, उपसचिव स्वप्नील कापडणीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, दादासाहेब खताळ, दीपक पोकळे, अवर सचिव बाबासाहेब शिंदे, कक्ष अधिकारी राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते.
दिव्यांग कर्मचारी रिना बारेला यांना स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण प्रदान
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com