१० वी, १२ वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन मिळणार

मुंबई :- माध्यमिक (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा /महाविद्यालयाशी संपर्क साधून हॉल तिकीट प्राप्त करावेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून मिळणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक/ प्राचार्यांचा शिक्का देणार असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. हॉल तिकीटामध्ये विषय व माध्यम बदल, फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरूस्त्या असतील तर विद्यार्थ्यांनी त्वरीत शाळेस/महाविद्यालयास कळवावे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची पुन्हा प्रिंट काढून दुय्यम प्रत (डुप्लीकेट) असा उल्लेख करून प्रवेशपत्र उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव शैलेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे  काम त्वरीत पूर्ण करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Fri Jul 12 , 2024
मुंबई :- मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. पुतळ्याचे प्रारुप (मॉडेल) सुद्धा मान्य झाले आहे. तथापि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्मारकातील हा पुतळा भव्य असल्याने त्यासाठी वेळ लागत आहे. स्मारकाचे हे संपूर्ण काम लवकर पूर्ण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य विजय उर्फ भाई गिरकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com