नागपूर :- आदिम यूथ फांऊडेशनचे कुणबी समाज भवन म्हाळगीनगर येथे आदिमांचा मेळावा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या प्रतिमेस माल्यार्पण केल्यानंतर मेळाव्यात दिप प्रज्वलन करून उपक्रमांची सुरूवात करण्यात आली. या आदिम मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून आदिम युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष भाऊराव पारखेडकर तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते, भास्कर चिचघरे, आदिम विचारवंत प्रकाश निमजे, ताराचंद बहारघरे व ओमप्रकाश पाठराबे मंचावर उपस्थित होते.
या मेळाव्यात सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते मार्गदर्शन करतांना म्हणाले कि आदिमांच्या उन्नतीसाठी हलबा समाजातील सुशिक्षित वर्गांनी समोर येऊन गरिबांना मदत केली पाहिजे. आदिम यूथ फांऊडेशनकडून गरीब व गरजवंताना मार्गदर्शन करण्यासाठी व आर्थिक मदत करण्यासाठी विविध रचनात्मक उपक्रम राबवित आहे म्हणून हलबा बांधवांनी या उपक्रमातून गरीबांना मदत करावी . आदिम यूथ फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांमध्ये सामाजिक जाणिव निर्माण व्हावी व त्यांच्यात परस्पर विचारांचे आदान प्रदान व्हावे यासाठी दरवर्षी हलबा समाजाचा स्नेह मेळावा आयोजित करून हि एक चांगली परंपरा निर्माण झाली आहे .
मेळाव्यात आदिम युथ फाऊंडेशनचे सदस्य वसंत देवीकर यांचे सन्मानपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील डॅा. दिपाली पाटील, रश्मी पाठराबे, रुचिका धापोडकर, अपेक्षा बुरडे, रितुल बोकडे,किरण निमजे यांचे माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी सत्कार केले.
आदिम युथ फाऊंडेशनच्या माध्यमाने विविध रचनात्मक उपक्रमांसाठी आर्थिक मदत करणारे शंकर बुरडे, धनराज पखाले,हरेंद्र गुमगावकर,प्रतिक पाठराबे,महेश बारापात्रे, सरिता गडकरी,रामराव देवघरे, भरत वाकोडीकर, डॅा. रमेश उमाठे ,विनायक वाघ, राजू पौनीकर, आशा वाघ व ज्येष्ठ समाजसेवक भास्कर केदारे यांचा प्रमुख अतिथीच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या हलबा मेळाव्यात गरजवंत विद्यार्थ्यां मिथीलेश नंदनवार, रियांशु सोनकुसरे, प्रलांशु हेडाऊ चैताली रामटेककर, भाविका निखारे, मयूर पौनीकर, आशिष निपाने, संकेत मुंढरीकर, खुशाली पराते ,राजीव नरेश पाठराबे, सुयश अनिल पाठराबे यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले तसेच हलबा समाजातील गरीब कुटुंब संकटात सापडल्यामुळे स्नेहा पराते, प्रभा तेलघरे यांनी आर्थिक मदत दिली
आदिम युथ फाउंडेशनने सन् २०२५ दिनदर्शिकाचे विमोचन प्रमुख अतिथींच्या हस्ते करून वितरण करण्यात आले. आदिम मेळाव्याचे प्रास्ताविक ओमप्रकाश पाठराबे, संचालन विनायक वाघ यांनी तर आभार हरेश निमजे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुरेश हेडाऊ, प्रमिला पराते,शंकरराव बुरडे, प्रेमनाथ रामटेककर, प्रकाश दुलेवाले,रामकृष्ण धार्मिक, निलकुटे,वासुदेवराव वाकोडीकर, किशोर पाटणकर, सुभाष चिमुरकर आदिंनी परिश्रम घेतले.