संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– गावात पसरली माकडांची दहशत
कामठी :- मागील काही दिवसांपासून कामठी तालुक्यातील खैरी गावात 200 च्या जवळपास लाल तोंडया माकडांनी घर करून बसले असून लोकांचा चावा घेणे, साहित्याची नासधूस करणे हे नित्याचेच झाले आहे.या प्रकारामुळे गावात या लाल तोंडया माकडांची दहशत पसरली असून गावात भीतीमय वातावरण पसरले आहे.
तेव्हा वनविभागाने ही बाब गांभीर्याने लक्षात घेता गावात असलेल्या या उपद्रवी लालतोंडया माकडांना जेरबंद करून त्यांची योग्यरीत्या विल्हेवाट लावावी अशी मागणी खैरी ग्रामपंचायत च्या सरपंच योगिता किशोर धांडे यांनी वनविभाग नागपूर चे वनसंरक्षक अधिकारी कडे केलेल्या निवेदनातून केले आहे.
या लालतोंडया माकडांनी गावातील 10 ग्रामस्थांचा चावा घेऊन जख्मि केले आहेत तसेच अनेक लहान मुले व महिलांना चावा घेण्याच्या प्रयत्न केला आहे.यासंदर्भात 11 जानेवारी ला संबंधित वनविभागाला निवेदित करून सद्यस्थितीची जणीव करून दिली होती मात्र संबंधित वनविभागाने या निवेदनाला केराची टोपली दाखवून अक्षम्य दुर्लक्ष केले तेव्हा या लालतोंडया माकडांचा चावा कुणाच्या जीवावर बेतणार तेव्हा या वनविभागाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईल का?असा प्रश्न सरपंच योगिता धांडे यांनी केला आहे.तेव्हा संबंधित वनविभागाने लवकरात लवकर या लालतोंडया माकडांना जेरबंद करून योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी करण्यात येत आहे.