संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- श्रीमती किशोरीताई भोयर अध्यापक महाविद्यालय कामठी येथे बी. एड. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गुरुंबद्दल श्रद्धा व भक्ती भाव व्यक्त करण्यासाठी गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी केली. गुरूंचे वेळोवेळी भेटणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे उपकार मानण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयात नुकताच पार पडला.
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती व अध्यक्षा प्राचार्य डॉ. शुभलक्ष्मी जगताप यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यांच्यासह वरिष्ठ प्राध्यापकांचे स्वागत करण्यात करण्यात आले. प्राचार्या डॉ. जगताप यांनी विद्यार्थी व गुरू यांच्यात असलेल्या पवित्र संबंधाची जान करून दिली. गुरू महान की शिष्य महान ? यावर प्रकाश टाकला. तसेच गुरू ला त्याचा शिष्य मोठा बनवत असतो. असे मत व्यक्त केले. त्यांनी रामकृष्ण परमहंस – स्वामी विवेकानंद, निवृत्तीनाथ – ज्ञानेश्वर, दीनानाथ मंगेशकर – लता मंगेशकर अशा महान गुरू-शिष्यांची आठवण करून दिली. कार्यक्रमाचे संचालन भारती कापगते व दिपशिखा सिंह यांनी केले. तसेच सर्व मान्यवरांचे आभार दीपक पांढरे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.