गुप्ता कोल वाशरीच्या धुळामुळे शेतीचे व ग्रामस्थाचे आरोग्यास नुकसान

संबधित अधिका-यांच्या उपस्थित शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची गुप्ता कोल वासरी कंपनी ची कबुली.  
रामटेक  : – गुप्ता कोल वाशरीच्या कोळश्या धुळीने शेतक-यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी आणि ग्रामस्थाचे आरोग्य धोक्यात आल्याने शेतक-यांनी वारंवार निवेदन देऊन दखल न घेतल्याने स्थानिय नागरिकांनी माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हयाच्या नेतुत्वात मा. वंदना सवरंगपते उपवि भागीय अधिकारी रामटेक यांचेशी शिष्टमंडळाने न्यायी क मागणी रेटुन धरल्याने संबधित अधिका-यांच्या उपस्थित गुप्ता कोल वासरी कंपनी व्दारे नुकसान ग्रस्त शेतक-यांना येणा-या आठ दहा दिवसात नुकसान भरपाई देण्याची कबुल करण्यात आली.
        गट ग्राम पंचायत घाटरोहणा (एंसबा) व गट ग्राम पंचायत वराडा (वाघोली) शिवार लगत येसंबा जवळ गुप्ता कोल वाशरी महामिनरल प्रायव्हेट लि. कंपनी याच वर्षी सुरू होऊन रोज चार, पाचशे ट्रक कोळसा येणे-जाणे आहे. खदानचा कोळशा आणुन उघडयावर टाकुन पोकलँड व जेसीबी मशीनने कोळशा बारीक करून प्रकिया करित ट्रक मध्ये भरून बाहेर पाठविला जातो. कोल वासरीची कोळशा धुळ उडुन वराडा, वाघोली, एंसबा, नांदगाव व गोंडेगाव परिसरातील १०० हेक्टर वर शेतातील मोसंबी, कापुस, तुर, गहु, चना, मिरची, वांगे, गोबी सर्वच पिकाचे भंयकर नुकसा न झाले आहे. कापुस काढण्यास शेतमजुर आले नाही. मोसंबी, मिरचे बाजारात विकायला नेल्यास कोणी घ्यायला तयार नव्हते. शेतपिकाचे अतोनात नुकासान शेतक-याला भोगावे लागले आहे. दिवसभर शेतात काम करताना उडणा-या धुळीने शरीर, कपडे काळे झाल्याने गावात जायची सुध्दा लाज वाटत होती. कंपनीतुन कोळसाच्या उडणा-या धुळीमुळे जमिन, विहीर, नाल्याचे पाणी प्रदुषित होऊन गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. नाले, विहीरीचे प्रदुषित पाणी नागरिक, जनावरे पित अस ल्याने शेतकरी, गावक-यांचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यास्तव शेतक-यांच्या व गावक-याच्या जिवाशी खेळ होऊ नये म्हणुन गुप्ता कोल वासरी कंपनीच्या कोळशा धुळीमुळे झालेले शेतपिका चे नुकसान शेतक-यांना त्वरित कंपनी मालकाने दयावे. तसेच गावापासुन दुर दुसरी कडे जिथे कुणाचे नुकसान होणार नाही अश्या ठिकाणी स्थानातरित करण्यात यावी. अशी न्यायीक मागणी प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांच्या नेतुत्वात मा. वंदना सवरंगपते उपविभागीय अधिकारी रामटेक यांचे कार्यालयात रेटुन धरल्याने मा. प्रशांत सांगाडे तहसिलदार पारशिवनी, मा. महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रण मंडळ अधिकारी, मा. वाघ, मंडळ कृषी अधिकारी हया संबधित अधिकारी व गुप्ता कोल वॉसरीज चे मा. गुप्ता हयांचे शी सखोल चर्चा करून कोल वॉसरी च्या धुळामुळे नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन व्यवस्था करून झालेले शेतक-यांचे नुकसान कृषी विभागाच्या अहवाला नुसार योग्य ती नुकसान भरपाई शेतक-यां ना येणा-या आठ ते दहा दिवसात देण्याची कबुली करण्यात आली. याप्रसंगी रामटेक क्षेत्राचे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव, नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष प्रभाकर खेडगरकर ,दिलीप राईकवार, कमलसिह यादव, घाटरोहणा (एंसबा) माजी सरपंच दिंगाबंर ठाकरे, उपसरपंच अशोक पाटील, किशोर बेहुणे, प्रकल्पग्रस्त शेतकरी तेजराम खिळेकर, दिलीप ठाकरे, कृष्णाजी खिळेकर, मारोतराव लसुंते, दिलीप चिखले, हिरालाल खिळेकर, घनश्याम वाढई, संदीप पांडे, रामा लांडगे, सुरज काळे, युवराज नाकतोडे, प्रमोद लांडगे, सुधाकर खिळेकर, धनराज पांडे, संदीप ठाकरे, अतुल चरडे, राजेश खिळेकर, सोनु ठाकरे, प्रमोद गि-हे, अकील अहमद खिजराई, प्रमोद ठाकरे, शालुबाई खिळेकर, शोभा पांडे, चंद्रभागा खिळेकर, अनुसया चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूरची सोनाली 'मिसेस इंडिया 2022' खिताबाची विजेती

Wed Mar 16 , 2022
नागपुर – खुशी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे आगरा येथील फलेहाबाद हॉटेल मध्ये मिस अँड मिसेस युनिव्हर्स सीझन-3 चे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे आयोजक रौनक सोलंकी होते. एकूण २४ प्रतिस्पर्धी यांना मागे टाकत नागपूरच्या सोनाली वर्मा यांनी मिसेस इंडिया २०२२ चा खिताब पटकावला. यापूर्वीही सोनाली वर्मा दिल्लीत झालेल्या ‘मालिकाये ताज’ या फॅशन शोची उपविजेती राहिली आहे. नागपूरच्या ‘हनी बीज लेडीज क्लब’च्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!