पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यास प्राधान्य देणार – पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई :- पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यासाठी शासनाला शक्य आहे, तिथे प्राधान्याने मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत दिले.

सदस्य रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत सोलापूर जिल्ह्याला दिलेले ७५ हजार नळ जोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत तसेच राज्यात सौर ऊर्जेवर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५ लाख ७६ हजार ०७८ नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. सन २०२३ अखेर प्रगतिपथावरील ८५५ पाणीपुरवठा योजनांमधील नळजोडण्या देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २४ नळयोजना सौर ऊर्जा प्रकल्पावर कार्यरत आहेत. नव्याने अशी काही मागणी आल्यास त्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गोपीचंद पडळकर, नरेंद्र दराडे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भिडेच्या अटकेसाठी बसपाने काढला आक्रोश मोर्चा

Fri Aug 4 , 2023
नागपूर :- भिडे नावाच्या किड्याने महापुरुषांचा अवमान केल्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल करून अटक करा या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने 36 जिल्ह्यात म्हणजेच राज्यभर आज 3 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे निदर्शने व आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नागपुरातील संविधान चौकात महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रीय प्रभारी भीम राजभर, प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजने, स्थानिक प्रदेश प्रभारी ऍड सुनील डोंगरे, प्रदेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com