कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत रस्ता सुरक्षा अभि यान सप्ताह निमित्ताने पो.स्टे हद्दीतील ऑटो रिक्षा चालकांना पोलीस स्टेशन कन्हान येथे वाहतुक नियमा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
बुधवार (दि.१५) जानेवारी २०२५ ला पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह २०२५ निमित्ताने पोलीस स्टेशन हद्दीतील ऑटो रिक्षा चालकांना पोलीस स्टेशन ला बोलावुन कन्हान पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील हयानी वाहतुक नियमा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. व त्यांना ऑटो चालवताना ड्रेसच्या वापर करावा, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसवण्यात येऊ नये, वाहतुक नियमाचे पालन करण्या करिता मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी राजेंद्र पाटील साहेब, पोलीस निरीक्षक, पो. स्टे. कन्हान, पोलीस नाईक अनिल यादव, शैलेश वराडे, अतिश मानवटकर, पोशि आकाश शिरसाठ, महिला पो.हवा. नालंदा पाटील सह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.