संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पंचायत समिती कामठी येथे तालुक्यातील सर्व सरपंचांसमवेत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावनकुळे यांनी आपापल्या गावांचे नेतृत्व करणाऱ्या सर्व सरपंच बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामीण महाराष्ट्रासाठी सरकारद्वारे विविध योजना राबवल्या जातात. त्या सर्व योजनांचा लाभ सर्व ग्रामपंचायतींनी घेतला पाहिजे व ग्रामस्थांना त्याची माहिती मिळाली पाहिजे, यासाठी सर्व सरपंचांनी प्रयत्न करण्याचे आवाहन सर्वांना केले.
यावेळी, माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा सरचिटणीस अनिल निधान, माजी सभापती उमेश रडके, उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी, तहसीलदार गणेश जगदाळे, गटविकास अधिकारी बाळासाहेब येवले यांच्यासोबत इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते