अरोली :- ग्रामपंचायत खात येथे दिनांक 24 डिसेंबर मंगळवार ला 3054 निधी अंतर्गत सीमेंट रास्ता बांधकाम करिता 35 लक्ष रुपये आणी 15 वित्त आयोग जी प निधी अंतर्गत भूमिगत नाली करिता 3.6 लक्ष रुपयाचे भूमिपूजन जि प सदस्या नागपूर राधा मुकेश अग्रवाल यांचे हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी जि. प .सदस्या नागपूर राधा मुकेश अग्रवाल, पं.स.मौदा सदस्या दुर्गा जांबुवंत ठाकरे,माजी पं.स. सदस्य मुकेश अग्रवाल ,खात सरपंचा माधुरी कैलाश वैद्य , उपसरपंचा कांचन पांडुरंग देवतारे ,माजी सरपंच कैलाश वैद्य,ग्रां.पं. सदस्य रविन्द्र मांडरकर, पुरुषोत्तम शर्मा , राकेश बागडे, शैलेश गिरीपूंजे ,तुळसा ढोलवार , बबीता खोब्रागडे, तुळसा गिरीपूंजे, निर्मला मेंढे ,सचिव अनूप रामटेके, ग्रां. पं. कर्मचारी तसेच गावकरी हजर होते.