संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानीक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील विशेष दिवस कार्यकम समिती, आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रसंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश्य स्पष्ट करतांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या भारतीय स्वातंत्र चळवळीतील योगदान तर साहित्य-रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदाना विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महावियालायाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी लोकमान्य टिळक यांनी सुरु केलेल्या सार्वजनिक उत्सवच्या महत्वावार तर अण्णाभाऊ साठे यांच्या तळागाळातील लोकांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. महाविद्यालयाचे उपप्राचर्य डॉ. मनीष चक्रवर्ती व डॉ. रेणू तिवारी यांनी हि आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.सिद्धार्थ मेश्राम, आय. क्यू.ए. सी. समन्वयक डॉ. प्रशांत धोंगळे, डॉ. अजहर अबरार, डॉ. महेश जोगी, ग्रंथपाल शिल्पा हिरेखान, गिरीष संगेवार व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन डॉ. विकास कामडी तर आभार प्रा. अमोल गुजरकर यांनी मानले.