नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आज संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, कलमकिशोर फुटाणे, विवेक इलमे, चंद्रभान पराते, सहाय्यक आयुक्त इंदिरा चौधरी, तहसिलदार महेश सावंत, महसुल सहायक हितेश थेटे, अमित हाडके यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.