नागपूर :- राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, दीपाली मोतीयाळे, विवेक इलमे, तहसीलदार अरविंद सेलोकर, स्वाती इसाई, दीपक काटे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.