नागपूर :- अस्पृश्यता, बालविवाह, हुंडा प्रथांना विरोध करणारे मराठी पत्रकार, ज्येष्ठ समाज सुधारक, कुशल वक्ते केशव सिताराम ठाकरे उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते रविवारी (ता.17) रोजी राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मनपाचे उपायुक्त रविंद्र भेलावे, उपायुक्त प्रकाश वराडे, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख महेश धामेचा, सहायक आयुक्त गणेश राठोड, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, नागपूर @2025चे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्हार देशपांडे, समन्वयक निमेश सुतारिया, शिवकुमार राव,सर गंगाधरराव चिटणवीस ट्रस्टच्या श्रीमती नेहा ठाकूर यांच्यासह मनपा अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.