नागपूर :- ‘प्रबोधनकार ठाकरे’ या नावाने महाराष्ट्राला परिचित असलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते व इतिहासकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात तहसिलदार शरद कांबळे यांनी ‘प्रबोधनकार ठाकरे’ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.